नगरसेविका अश्विनी कांबळे अपात्र :अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध :-
सांगली :दी. 10 जुलै :-सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २० ‘ब’ मधील नगरसेविका अश्विनी दत्तात्रय कांबळे (अश्विनी विनोद कोळी) यांना महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे ‘कोळी महादेव’ अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून जप्त केले आहे. या निर्णयानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी ९ जुलै २०२६ रोजी अपात्रतेचे आदेश जारी केले.
अश्विनी कांबळे यांनी जानेवारी २०२६ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग २० ‘ब’ मधून निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य ठरवले.
समितीच्या निर्णयानुसार त्या नगरसेवक पदासाठी अपात्र ठरल्या असून, प्रशासनाने या निर्णयाची माहिती राज्य निवडणूक आयोगासह संबंधित विभागांना पाठवली आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.







