अजित पवारांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश; शाळा, महाविद्यालयांमध्येही होणार आयोजन
मुंबई:महाराष्ट्र शासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २२ जुलै रोजीच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले असून, राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा दिवस शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात येणार आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा परिचय करून देणारे कार्यक्रम, व्याख्याने आणि अभिवादनाचे उपक्रम आयोजित करण्यात येतील.
या निर्णयामुळे २२ जुलै हा दिवस राज्यभरात शासकीय स्तरावर साजरा होणाऱ्या महत्त्वाच्या दिनांमध्ये समाविष्ट झाला आहे. शासनाच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात तसेच विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये तसेच शाळा आणि महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






