बांधकाम कामगारांच्या योजना पूर्ववत करा :अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा :-


बांधकाम कामगारांच्या योजना पूर्ववत करा :अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा :-

सांगली :दी. 15 जुलै :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजना बंद केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इयत्ता पहिली ते आठवी, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अर्थसहाय्य, एमएससीआयटी, नैसर्गिक मृत्यूवरील मदत, प्रसूती सहाय्य व इतर योजना पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण व अर्थसहाय्याचे अर्ज तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक (आबा) हेगडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने, शहराध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण आणि कार्याध्यक्ष अफजल मुजावर यांनी दिला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे. 9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!