ZP ची बनावट कागदपत्रे तयार करून इमारत उभारली; शिंदे गटाच्या दोन नेत्यांसह चौघांना अटक


ZP ची बनावट कागदपत्रे तयार करून इमारत उभारली; शिंदे गटाच्या दोन नेत्यांसह चौघांना अटक

मुंबई/डोंबिवली:
डोंबिवली परिसरात जिल्हा परिषदेची (ZP) बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर इमारत उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात घर खरेदीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवसेना (शिंदे गट)च्या दोन स्थानिक नेत्यांसह एकूण चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची बनावट परवानगी, खोटे शिक्के आणि बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे संबंधित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सदनिकांची विक्री करून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे स्थानिक पदाधिकारी रामचंद्र माने आणि लक्ष्मण मिसाळ यांच्यासह रामदास टेकाळे व मोहनलाल चौधरी यांचा समावेश आहे. या चौघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच इतर बांधकामांमध्येही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर झाला आहे का, याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
या प्रकरणामुळे बेकायदेशीर बांधकामे आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!