थेरगाव परिसरातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ जुलै रोजी गुणगौरव समारंभ


थेरगाव परिसरातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ जुलै रोजी गुणगौरव समारंभ

पिंपरी-चिंचवड :थेरगाव परिसरातील सन २०२६ मध्ये दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संतोष मंगल कार्यालय, संतोषनगर, थेरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दि. २० जुलै २०२६ पर्यंत जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था किंवा जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, संतोषनगर, थेरगाव येथे जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, दैनिक प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. संतोष नागूभाऊ बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
थेरगाव परिसरातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत गुणपत्रिका जमा करून या गुणगौरव समारंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांनी जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
982254829


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!