७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट


७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

नवी दिल्ली | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी

७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवला आहे.

परेश मोकाशी यांच्या कारकिर्दीतील हा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ठरला आहे. यापूर्वीही त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला आहे.

दरम्यान, यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) आणि ममूट्टी (भ्रमायुगम) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर यामी गौतम (आर्टिकल ३७०) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!