‘आर्टिकल ३७०’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; कार्तिक आर्यन आणि ममूट्टी यांना संयुक्त राष्ट्रीय पुरस्कार


‘आर्टिकल ३७०’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; कार्तिक आर्यन आणि ममूट्टी यांना संयुक्त राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली | ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शनिवारी घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा मान पटकावला.
‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी कार्तिक आर्यन आणि ‘भ्रमायुगम’ या मल्याळम चित्रपटासाठी ममूट्टी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘आर्टिकल ३७०’ मधील प्रभावी भूमिकेसाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार २०२४ मध्ये सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांच्या कामगिरीच्या आधारे देण्यात आले आहेत. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विविध भारतीय भाषांतील चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!