नाणेघाटात वर्षा पर्यटनादरम्यान तरुण दरीत कोसळला; शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू
पुणे : पुणे जिल्ह्यातील नाणेघाट परिसरात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत पडल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. दत्ता विनायक लोंढे (वय २२, रा. आंबेगाव) हा मित्रांसोबत नाणेघाट परिसरात फिरत असताना हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, सततचा मुसळधार पाऊस, दाट धुके आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, तरुणाचे मोबाईल लोकेशन ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत आढळून आल्याने त्या दिशेनेही बचाव पथक रवाना करण्याची तयारी सुरू आहे. तसेच दरीत मोबाईलची रिंग वाजत असल्याची माहिती समोर आल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 36





