राजस्थानमध्ये ‘मराठी स्टडी सेंटर’वरून वाद; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निर्णयाला विरोध


राजस्थानमध्ये ‘मराठी स्टडी सेंटर’वरून वाद; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निर्णयाला विरोध

जयपूर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राजस्थान विद्यापीठात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करत काही स्थानिक संघटना आणि नागरिकांनी आंदोलन छेडले असून, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

काही ठिकाणी आंदोलकांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याचे वृत्त आहे. “राजस्थानमध्ये मराठी स्टडी सेंटरची आवश्यकता काय?” असा सवाल उपस्थित करत या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणामुळे भाषा आणि सांस्कृतिक प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!