राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे धरणे आंदोलन; दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक
नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदार आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्लीत आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संबंधित भागातील वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






