दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे हस्तांदोलन करून स्वागत केले आणि दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थी आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेले असतानाच झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः शरद पवार गटाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
मात्र, या भेटीनंतर शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दाव्याकडे अधिकृत माहिती येईपर्यंत केवळ राजकीय चर्चेच्या स्वरूपातच पाहिले जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429




