अजित पवारांच्या विमान अपघातस्थळी सुनेत्रा पवारांची भावपूर्ण आदरांजली
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पवार कुटुंबीयांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. काल मध्यरात्री अजित पवार यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर आज पवार कुटुंबीयांनी गोजुबावी गावाजवळील त्या धावपट्टी परिसराला भेट दिली, जिथे अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी त्या अत्यंत भावूक झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या सोबत पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली अर्पण केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






