ठाणे : श्रीनगरमधील अय्यप्पा मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला


ठाणे : श्रीनगरमधील अय्यप्पा मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

ठाणे : श्रीनगर परिसरातील अय्यप्पा मंदिराजवळ आज (२७ जुलै) पहाटे अंदाजे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!