विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शालेय बससाठी नवे सुरक्षा नियम लागू


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शालेय बससाठी नवे सुरक्षा नियम लागू

मुंबई:
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत राज्य सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०२६ अंतर्गत शालेय बस वाहतुकीसाठी नवीन सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार, मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व भागांमध्ये शालेय बसची वयोमर्यादा १५ वर्षांवरून २० वर्षे करण्यात आली आहे.
शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता अत्याधुनिक सुविधा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (VTS), पॅनिक बटण, फायर अलार्म आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सीटबेल्ट बसवणे बंधनकारक असेल. तसेच ३० दिवसांच्या फुटेज बॅकअपसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेही आवश्यक राहील.
याशिवाय, पालकांना आपल्या पाल्याच्या बसचे थेट लोकेशन मोबाईल ॲपद्वारे पाहता यावे, यासाठी बस ऑपरेटरना ॲपची सुविधा उपलब्ध करून देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
शालेय बसच्या शुल्काबाबतही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, शुल्काचे दर निश्चित करण्याचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTO) यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत होईल, तसेच पालकांनाही आपल्या पाल्याच्या प्रवासावर रिअल-टाइम लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!