सिन्नर एमआयडीसी बायपास उड्डाणपुलावर भीषण अपघात; ट्रक ५० फूट खाली कोसळला, चालक गंभीर जखमी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी बायपास उड्डाणपुलावर रविवारी (२६ जुलै) भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने पुलाचा कठडा तोडला आणि सुमारे ५० फूट खाली कोसळला.
या भीषण अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 52






