मुंब्रा येथे इमारतीच्या गॅलरीचा सज्जा कोसळला; एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू


मुंब्रा येथे इमारतीच्या गॅलरीचा सज्जा कोसळला; एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंब्रा: मुंब्रा येथे एका इमारतीच्या गॅलरीचा सज्जा अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली एक मुलगी अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकार्याने बचावकार्यात सहभाग घेतला. त्यांच्या मदतीने ढिगाऱ्यातून अनेक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले तसेच इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यात आली.
मात्र, या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी : सिंथिया कोरिया


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!