माळशेज घाटातील खिरेश्वर गावाजवळ रस्ता खचला; मुंबईकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद
माळशेज घाट: मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील खिरेश्वर गावाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्याची पाहणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे तसेच पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रतिनिधी स्वप्नील लुनावत






