केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गेरा इम्पेरियम को-ऑपरेटिव्ह सोसायटीला अभ्यास भेट


केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गेरा इम्पेरियम को-ऑपरेटिव्ह सोसायटीला अभ्यास भेट

​पुणे, दि. २९ जुलै : पुणे जिल्हा हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेरा इम्पेरियम कमर्शियल कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पुणे येथे विशेष अभ्यास भेट दिली.
​या प्रसंगी पुणे जिल्हा हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे श्री. नरोना सर व सौ. कोष्टी मॅडम यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना पुण्यातील उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची माहिती दिली. त्यामध्ये गेरा इम्पेरियम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची निवड करण्यात आली होती.
​सोसायटीच्या भेटीदरम्यान अध्यक्ष श्री. अभिजित कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांचे स्वागत करून सोसायटीच्या कार्यपद्धतीची, प्रशासन व्यवस्थेची तसेच सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. सहकारी संस्थांच्या प्रभावी व पारदर्शक व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
​या कार्यक्रमास सोसायटीचे पदाधिकारी सीए दयानंद नाहेरे, सीए हनुमंत चोधरी , सीए राजेंद्र कालिया तसेच डॉ. महेंद्र सेठी उपस्थित होते. त्यांनीही भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला.
​अभ्यास भेटीदरम्यान सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुशासन, व्यवस्थापन व सदस्य सहभागाबाबत सकारात्मक चर्चा झाली. गेरा इम्पेरियम सोसायटीच्या कार्यपद्धतीचे व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे उपस्थित अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!