कॅसल मिल परिसरातील आंबे घोसाळे तलावात ५० वर्षीय महिलेची उडी; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू
ठाणे:
कॅसल मिल परिसरातील आंबे घोसाळे तलावात सुमारे ५० वर्षीय महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. संबंधित महिलेने कोणत्या कारणास्तव हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 49








