पुण्यात दारूच्या नशेत कारमधून धोकादायक स्टंट; हरियाणातील ४ तरुणांना अटक
पुण्यातील सेनापती बापट रोड परिसरात दारूच्या नशेत कारमधून धोकादायक स्टंटबाजी करत धिंगाणा घालणाऱ्या हरियाणातील चार तरुणांवर डेक्कन पोलिसांनी कारवाई केली आहे. मित्रांना भेटण्यासाठी पुण्यात आलेल्या या तरुणांचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून त्यांचा शोध घेतला.
डेक्कन पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 46




