पुण्यात धर्मांतराच्या आरोपावरून ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरूविरोधात गुन्हा


पुण्यात धर्मांतराच्या आरोपावरून ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरूविरोधात गुन्हा

पुणे : गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये प्रवचनादरम्यान धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. ७ ऑगस्ट रोजी कथित प्रकार घडला असून ९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला, अशी माहिती समोर आली आहे.
हा गुन्हा महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या नव्या कायद्यानुसार पुण्यात नोंद झालेल्या सुरुवातीच्या गुन्ह्यांपैकी हे एक प्रकरण असल्याचे वृत्त आहे. या कायद्यानुसार धर्मांतरासाठी फसवणूक, प्रलोभन, दबाव किंवा इतर बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्यास कारवाईची तरतूद आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि कथित धर्मांतराचा प्रयत्न झाला का, याचा खडक पोलीस तपास करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!