स्मार्ट मीटरनंतर २ लाख १८ हजारांचे वीज बिल; हिंगोलीतील महिलेचा महावितरणविरोधात आक्रोश


स्मार्ट मीटरनंतर २ लाख १८ हजारांचे वीज बिल; हिंगोलीतील महिलेचा महावितरणविरोधात आक्रोश

हिंगोली : घरात केवळ तीन दिवे, दोन पंखे आणि एक टीव्हीचा वापर होत असताना नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल २ लाख १८ हजार रुपयांचे वीज बिल आल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीतील सिद्धार्थनगर परिसरात समोर आला आहे.
सिद्धार्थनगर येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रभावती श्रावणे यांना हे बिल आले आहे. एवढे मोठे बिल भरणे शक्य नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बिलामध्ये सवलत देऊन १ लाख ३२ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आल्याचा दावा श्रावणे यांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हिंगोलीत स्मार्ट मीटरविरोधात मोर्चाही काढण्यात आला. मोर्चात नागरिकांसह विविध राजकीय नेते सहभागी झाले.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवाजवी वीज बिल आल्याच्या तक्रारींची महावितरणने तातडीने चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!