‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणे कायदेशीर संरक्षण; राष्ट्रपतींची मंजुरी
नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत **‘वंदे मातरम्’**ला आता ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण आणि वैधानिक दर्जा मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक २०२६’ला मंजुरी दिली आहे.
संसदेने गेल्या महिन्यात हे विधेयक मंजूर केले होते. या सुधारणेद्वारे १९७१ च्या Prevention of Insults to National Honour Act मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’चा अवमान किंवा त्याच्या गायनात जाणूनबुजून अडथळा आणण्यास कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेले ऐतिहासिक राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रगीताप्रमाणेच त्याला कायदेशीर संरक्षण मिळाल्याने या गीताचा सन्मान आणि प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




