GST उपायुक्तावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल; ₹15 लाखांची मागणी, ₹8 लाख स्वीकारल्याचा आरोप
नवी मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत माझगाव येथील विक्रीकर विभागातील GST उपायुक्त दीपक क्षीरसागर यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षीरसागर यांनी कथितरित्या ₹15 लाखांची लाच मागितली असून, त्यापैकी ₹8 लाख स्वीकारल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी नवी मुंबई ACB पथकाने कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. लाच मागणी आणि स्वीकारण्यासंदर्भातील आरोपांची चौकशी ACBकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 66




