खारघरमध्ये ज्वेलर्सचे दुकान फोडले; १.६४ कोटींचे दागिने लंपास


खारघरमध्ये ज्वेलर्सचे दुकान फोडले; १.६४ कोटींचे दागिने लंपास

नवी मुंबई : खारघर परिसरातील कॅन्डेअर लाइफस्टाइल ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल ₹१ कोटी ६४ लाखांचे दागिने आणि ₹३० हजारांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर हिरे, सोने आणि प्लॅटिनमचे तब्बल २३४ दागिने चोरी केल्याचे समोर आले आहे.
११ ऑगस्ट रोजी सकाळी दुकान उघडण्यात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके तपास करत आहेत.
या धाडसी चोरीमुळे खारघर परिसरात खळबळ उडाली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणातील दागिने चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!