दगडूशेठ मंदिर विस्ताराचा मार्ग मोकळा; फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाणे होणार स्थलांतरित
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या सध्याच्या इमारतींची जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला पुणे पोलिसांनी तत्त्वतः सहमती दर्शवली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (NOC) गृह विभागाकडे पाठवले आहे. त्यामुळे मंदिराच्या विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा पुढे सरकला आहे.
मात्र, दोन्ही पोलीस ठाण्यांच्या सध्याच्या जागा तातडीने रिकाम्या केल्या जाणार नाहीत. मंडई मेट्रो स्टेशनजवळ नवीन पोलीस ठाण्याची इमारत उभारल्यानंतरच सध्याची जागा मंदिर ट्रस्टकडे हस्तांतरित केली जाणार आहे.
मंदिराच्या विस्तारीकरणामुळे परिसरातील भाविकांची गर्दी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या दृष्टीनेही बदल अपेक्षित आहेत. नवीन पोलीस इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्थलांतराची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





