चाकण MIDC मधील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजवा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश


चाकण MIDC मधील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजवा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या समस्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. औद्योगिक परिसरातील सर्व खड्डे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
उद्योजकांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी १० महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. तसेच चाकण MIDC मधील स्थानिक समस्या आणि तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दरबार’ भरविण्यात येणार आहे.
कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. दोषी कंत्राटदारांना थेट ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण, वाहतूक कोंडीवर पोलीस कारवाई, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यास उद्योजक, कामगार आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!