मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा’; कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचे विधान


‘मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा’; कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचे विधान

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेदरम्यान राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा शहराचा उल्लेख ‘मुंब्रादेवी’ असा करण्याचे आवाहन केले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विश्व हिंदू परिषद आणि श्री मुंब्रेश्वर महादेव कावडिया मंडळाच्या वतीने मुंब्रा येथे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत बोलताना नितेश राणे यांनी, “मुंब्रादेवी परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहील,” असे म्हटले.
यापुढे या परिसराचा उल्लेख ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ असा करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी त्यांनी, “हा देश हिंदूराष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही,” अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला.
कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंब्रा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मंत्रालयात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याचा दावा करत हिंदू समाजाने कोणत्याही भीतीशिवाय आपले सण आणि उत्सव उत्साहात साजरे करावेत, असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.
प्रतिनिधी – उमेश कुलकर्णी


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!