चऱ्होलीत ‘प्राइड वर्ल्ड सिटी वेलिंग्टन ज्येष्ठ नागरिक संघा’ची स्थापना; मोफत आरोग्य शिबिराचा ४०० जणांनी घेतला लाभ
चऱ्होली (प्रतिनिधी):
भारतीय ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट २०२६) चऱ्होली येथील ४०० एकरांमधील ‘प्राइड वर्ल्ड सिटी’ टाऊनशिपमध्ये ‘प्राइड वर्ल्ड सिटी वेलिंग्टन ज्येष्ठ नागरिक संघ’ (Pride World City Wellington Senior Citizen Forum) या नवीन फोरमची स्थापना उत्साहात करण्यात आली.
या फोरमचे उद्घाटन प्राइड वर्ल्ड सिटीचे चेअरमन मा. अरविंद जैन, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, नगरसेवक मा. सचिन तापकीर तसेच दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन फटांगरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी फोरमच्या वतीने मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, याचा लाभ ४०० नागरिकांनी घेतला.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक फोरमच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. कैलास पंढरीनाथ नेवासकर, उपाध्यक्षपदी श्री. मदन मोहन मिश्रा व सौ. यशश्री कसरेकर, जनरल सेक्रेटरीपदी डॉ. दिलीप शेटे, सेक्रेटरीपदी श्री. शेषपाल हजारी व सौ. संध्या पटवर्धन, तर कोषाध्यक्षपदी श्रीमती शालिनी बंदावणे व श्री. अशोक गावंडे यांची निवड करण्यात आली. तसेच संचालकपदी नामदेव कावासादीकर, श्रीमती सुनंदा बराई व श्रीमती अनिता देशमुख यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन वेलिंग्टन सांस्कृतिक समिती यांनी केले.
.
विजय अडसूळ (प्रतिनिधी)




