दुबईहून आलेल्या सुनेची सासूकडून हत्या; अपघाताचा बनाव उघड


दुबईहून आलेल्या सुनेची सासूकडून हत्या; अपघाताचा बनाव उघड

मुंबई : दुबईहून मुलाच्या सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या ३५ वर्षीय सपना प्रमोद गंजी यांचा घाटकोपर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या सासू धनलक्ष्मी गंजी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
घाटकोपर येथील त्रिवेणी अपार्टमेंटमध्ये सपना यांच्यावर कथितपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे डोके भिंतीवर तसेच जमिनीवर आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.
दरम्यान, घटनेनंतर सपना बाथरूममध्ये घसरून पडल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, मृतदेहावरील जखमा आणि मारहाणीच्या खुणांमुळे कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून चौकशी सुरू केली.
पोलिसांच्या चौकशीत कथित मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर धनलक्ष्मी गंजी यांच्याविरोधात पंत नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
घटस्फोटाचा जुना वाद आणि कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंत नगर पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!