भोसरीतील उड्डाणपूल पाडून डबल डेकर उड्डाणपूल उभारणार; मेट्रोसह रस्ते वाहतुकीला मिळणार स्वतंत्र मार्ग


भोसरीतील उड्डाणपूल पाडून डबल डेकर उड्डाणपूल उभारणार; मेट्रोसह रस्ते वाहतुकीला मिळणार स्वतंत्र मार्ग

पिंपरी, दि. २० ऑगस्ट २६: प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी भोसरीतील विद्यमान उड्डाणपूल पाडून त्याच ठिकाणी डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात नगरसदस्यांना देण्यात आली. प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत नगरसदस्यांसमोर सादरीकरण करताना प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

या प्रस्तावित डबल डेकर उड्डाणपुलामध्ये एका स्तरावर मेट्रो मार्गिका, तर दुसऱ्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच बांधकामाच्या माध्यमातून मेट्रो आणि रस्ते वाहतुकीची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रस्तावित मेट्रो मार्गाची आखणी, मार्गातील विविध पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत यावेळी नगरसदस्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यमान उड्डाणपूल पाडून नवीन डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावामुळे भोसरीतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.

दरम्यान, प्रस्तावित मेट्रो मार्ग आणि डबल डेकर उड्डाणपुलाबाबत नगरसदस्यांनी आपल्या सूचना प्रशासनाकडे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले. या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिक वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि भविष्यातील वाहतुकीची वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!