१२ व्या मजल्यावरून उडी घेत २६ वर्षीय दिव्यांग तरुणाची आत्महत्या; महिलेवर छळाचा आरोप


१२ व्या मजल्यावरून उडी घेत २६ वर्षीय दिव्यांग तरुणाची आत्महत्या; महिलेवर छळाचा आरोप
पुणे :
भोसरी परिसरात एका २६ वर्षीय दिव्यांग तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनोद चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून, एका महिलेच्या कथित मानसिक छळाला आणि ५५ हजार रुपयांच्या अतिरिक्त पैशांच्या मागणीला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी विनोदने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आपला मानसिक छळ करत असून, आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्याने नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सरोज नावाच्या महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा तसेच पैशांच्या मागणी व कथित मानसिक छळाच्या आरोपांचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील व्हिडिओ, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!