महापालिका सभेलाही भाजपच्या अंतर्गत कलहाची बाधा; शहराचे प्रश्न वाऱ्यावर


महापालिका सभेलाही भाजपच्या अंतर्गत कलहाची बाधा; शहराचे प्रश्न वाऱ्यावर

पिंपरी, दि. २० ऑगस्ट २६: शहरातील भटके कुत्रे, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसारखे महत्त्वपूर्ण प्रश्न महापालिका सभेत निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना, सत्ताधारी भाजपने सभा तहकूब केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र शहरातील मूलभूत प्रश्नांवर निर्णय घेण्याऐवजी सभा तहकूब करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजपमधील अंतर्गत मतभेदांचा फटका आता थेट महापालिकेच्या कामकाजाला बसत असल्याची चर्चा आहे. विशेषतः स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांच्या निवडीवरून सत्ताधारी गटात मतभेद असल्याचे बोलले जात
असून, मागील आठ महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. सात नगरसेवकांची अंतिम यादी निश्चित होत नसल्याने पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याचा फटका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही बसत आहे.

विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!