दोन तासांची मनधरणी निष्फळ; चांदगुडे कुटुंब उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर: खडक्या डोंगराच्या कड्यावर आत्महत्येच्या तयारीत उभ्या असलेल्या १८ वर्षीय कुणालला वाचवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी तब्बल दोन तास त्याची मनधरणी केली. “आईसाठी तरी जग…” अशी विनवणी करूनही कुणाल मागे हटला नाही.
मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी जीवाची पर्वा न करता त्याच्याकडे झेप घेतली. मात्र, झटापटीत दोघेही सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळले. पती आणि मुलाला डोळ्यांसमोर दरीत पडताना पाहून आईनेही दरीत उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण चांदगुडे कुटुंब उद्ध्वस्त झाले.
कुणालने वर्षभरापूर्वीही याच ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला सुखरूप वाचवले होते. कुणाल हा कुटुंबातील एकमेव मुलगा होता आणि तो नीट परीक्षेची तयारी करत होता. क्षुल्लक कौटुंबिक वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







