छत्रपती संभाजी नगर मधील खवडा डोंगर वर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैव मृत्यू.


छत्रपती संभाजी नगर मधील खवडा डोंगर वर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैव मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगरमधील खवडा डोंगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आधी मुलगा आणि त्याच्या वडिलांचा दरीत पडून मृत्यू झाला, तर हे दृश्य पाहिल्यानंतर आईनेही दरीत उडी घेतल्याने तिचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, १४ वर्षीय कुणालने खरेदी केलेल्या आयफोनच्या थकीत हप्त्यांवरून त्याचे वडिलांशी वारंवार वाद होत होते. याच वादातून कुणाल खवडा डोंगर परिसरात गेल्याचे सांगण्यात येत आहे.

कुणाल डोंगर परिसरात गेल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील त्याच्या मागे गेले. मात्र, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेल्याने दोघेही दरीत कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहिल्यानंतर आईनेही दरीत उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

प्रतिनिधी:  शाम शिरसाठ पुणे


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!