पारध येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात


पारध येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

पारध (शाहूराजे) : श्री पराशर महाराज संस्थान, यांच्या वतीने श्रीक्षेत्र पारध (शाहूराजे), ता. भोकरदन, जि. जालना येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद् भागवत कथा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सप्ताहाची सुरुवात शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सांगता होणार आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी श्रीमद् भागवत कथा, तर सायंकाळी हरिकीर्तन व त्यानंतर जागराचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध संत-महंत व कीर्तनकारांचे प्रवचन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी सप्ताहाच्या प्रारंभी ह.भ.प. प्रभाकर महाराज सपकाळ, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. तसेच सप्ताहादरम्यान ह.भ.प. पवन महाराज, ह.भ.प. अंबादास महाराज लोखंडे, ह.भ.प. अमृतानंद महाराज
ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर,
ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्यासह विविध मान्यवर कीर्तनकार व महाराजांचे कीर्तन-प्रवचन होणार आहे. श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते, पिंपळगाव रेणुकाई हे भागवत कथा निरूपण करणार आहेत.

सप्ताहाच्या निमित्ताने पारध व परिसरातील भाविकांसाठी धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी व भजनी मंडळी, पारध (शाहूराजे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्ताहाची सांगता शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी होणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे पदाधिकारी, भजनी मंडळी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

महेंद्र बेराड
प्रतिनिधी, पारध


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!