रस्ता खचला; डंपर १२ फूट खड्ड्यात कोसळला, नाशिक पालिकेचा भोंगळ कारभार उघड


रस्ता खचला; डंपर १२ फूट खड्ड्यात कोसळला, नाशिक पालिकेचा भोंगळ कारभार उघड

नाशिक: गंगापूर रोडवरील नवशा गणपती परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाच अचानक रस्ता खचल्याने खडीने भरलेला डंपर थेट १० ते १२ फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रस्त्याच्या कामादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कामाच्या दर्जाबाबत तसेच नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्ते खचणे, खड्डे आणि निकृष्ट कामांमुळे यापूर्वीही नाशिकमध्ये दुर्घटना घडल्या असून, आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे नाशिक महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!