PDHA हॉकी असोसिएशन फाईव्ह साईड टूर्नामेंट: अंतिम सामन्यात जे जे स्पोर्ट्स अकॅडमीला नमवत पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस संघ ठरला विजेता


PDHA हॉकी असोसिएशन फाईव्ह साईड टूर्नामेंट: अंतिम सामन्यात जे जे स्पोर्ट्स अकॅडमीला नमवत पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस संघ ठरला विजेता

​कोथरूड, पुणे:PDHA तर्फे कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हॉकी असोसिएशन फाईव्ह साईड टूर्नामेंट’च्या अंतिम सामन्यात पुणे सिटी व पिंपरी चिंचवड पोलीस संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. रोमहर्षक ठरलेल्या अंतिम लढतीत पोलीस संघाने ‘जे जे स्पोर्ट्स अकॅडमी’चा २-१ असा पराभव केला.
​सामन्याच्या सुरुवातीलाच जगदीश कस्तुरे यांच्या सुरेख पासवर विनोद निंभोरे यांनी पहिला मैदानी गोल नोंदवून पोलीस संघाला १-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर जे जे स्पोर्ट्स अकॅडमीच्या जय जंगम यांनी प्रतिहल्ला करत १ गोल नोंदवला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.
​मध्यंतरानंतर दोन्ही संघांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. सामन्याच्या अगदी शेवटच्या मिनिटाला कुणाल जगदाळे यांच्या पासवर जगदीश कस्तुरे यांनी गोल डागत संघाला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
​या यशस्वी कामगिरीसाठी पुणे शहर पोलीस संघाला व्यवस्थापक व कोच वाईद पठाण तसेच पुणे शहर पोलीस निरीक्षक अमर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
​विजेता पुणे शहर पोलीस संघ:
गणेश पालांडे (गोलकीपर), जगदीश कस्तुरे, संतोष स्वामी, सुधीर सुतके, विनोद निंभोरे, गणेश गिरी गोसावी, कुणाल जगदाळे, इंदल सूर्यवंशी, गौरव कांबळे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!