NDAचा ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी २०२९ चा प्लॅन; २२ राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार


NDAचा ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी २०२९ चा प्लॅन; २२ राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार

नवी दिल्ली : देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेच्या दिशेने NDA सरकारकडून मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. NDAकडून २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या प्रस्तावित कायद्यात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी करण्यासाठी २०३४ चा कालावधी गृहीत धरला जात असताना, २०२९ मध्येच मोठ्या प्रमाणावर निवडणुका एकत्र घेण्याचा हा पर्यायी आणि आगाऊ प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे.
एकाच वेळी निवडणुका घेतल्यास वारंवार लागू होणारी आचारसंहिता, निवडणूक खर्च आणि प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते, असा सरकार समर्थकांचा दावा आहे. मात्र, सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक एकत्र आणण्यासाठी घटनात्मक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत पुढील काळात केंद्र सरकारकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!