राष्ट्रीय अंतराळ दिवस : भारताच्या अंतराळ प्रवासाला उजाळा


राष्ट्रीय अंतराळ दिवस : भारताच्या अंतराळ प्रवासाला उजाळा
नवी दिल्ली : आज देशभरात तिसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जात आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक प्रगतीचा गौरव करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि देशातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
ISROचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी भारताच्या अंतराळ प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि आजची प्रगती यांचा आढावा घेतला. सायकलवरून रॉकेटचे भाग नेण्यापासून ते चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेपर्यंत भारताने मोठा टप्पा पार केला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
चांद्रयान-३च्या यशानंतर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात मानवी अंतराळ मोहिमेसह अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा राबवण्याच्या दिशेने ISROची वाटचाल सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!