शेतीसाठी सहा तासांऐवजी दहा तास वीज द्या : कोकणे, बोडखे,

टाकळीभान: पावसाने खंड दिल्यामळे सध्या शेतातील उभी पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक असताना शेतीसाठी केवळ सहा तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच उपलब्ध वीजपुरवठ्याच्या सहा तासात घडोघडी वीज ये-जा करीत असल्याने प्रत्यक्षात सिंचनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे शेतीसाठी सहा तासांऐवजी किमान दहा तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे उत्तरअ.नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे व तालुका उपाध्यक्ष बंडूपंत बोडखे यांनी केली आहे.
सध्या खरीप हंगामातील पिके वाढीच्या व फुलधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून, पावसाने गेल्या सुमारे तीन आठवड्यापासुन दडी मारली आहे. पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागल्याने खरीप पिके माना टाकु लागले आहेत. या कोवळ्या पिकांना आवश्यकतेनुसार पाणी मि ळाले नाही तर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी भांडवली खर्च करून मशागत, बियाणे, खते, औषधे यासाठी मोठा खर्च करुन खरीपाची पिके उभी केली आहेत. माञ केवळ पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.
या पिकांना पाणी देण्याचा शेतकऱ्यांचा सध्या आटापिटा सुरु आहे. मात्र सध्या शेतीसाठी सहा तास वीजपुरवठा केला जात आहे तोही कधी रात्री तर कधी पहाटे तर कधी दिवसा. या सहा तासातही अनेकदा वीज खंडित होते. वीज ये-जा करत असल्याने मोटारी सुरू करण्यात अडचणी येतात.
अनेक वेळा मोटार सुरू केल्यानंतर काही वेळातच वीज गेल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी, वीज उपलब्ध असलेल्या सहा तासांपैकीही प्रत्यक्षात पूर्ण वेळ सिंचनासाठी वापरता येत नसल्याची परिस्थिती आहे.
पावसाचा खंड पडलेल्या काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध साधनांचा पूर्ण वापर करता येणे गरजेचे आहे. मात्र, मर्यादित वीजपुरवठा आणि वारंवार होणारे वीजखंडित यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. रात्रीच्या वेळी वीज येण्याची वाट पाहत शेतकऱ्यांना शेतात थांबावे लागते.
परीसरात बिबट्यांची प्रचंड दहशत असतानाही जीव मुठीत धरुन रात्रपाळी करावी लागत आहे. त्यातच सहा तासाची वेळोवेळी खंडीत होणारा वीज पुरवठा. त्याम ळे आधीच त्रस्त झालेला शेतकरी अधिक त्रस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर म हावितरण प्रशासनाने पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीसाठीचा वीजपुरवठा सहा तासांऐवजी किमान दहा तास करावा अन्यतः संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाहीत आसा इशाराही राजेंद्र कोकणे व बंडू पंत बोडखे यांनी दिला आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







