खेड तालुक्यातील नांदूरच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सतीश जाधव आणि उपाध्यक्षपदी बबनराव चिखले यांची निवड,ग्रामस्थांकडून अभिनंदन


खेड तालुक्यातील नांदूरच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सतीश जाधव आणि उपाध्यक्षपदी बबनराव चिखले यांची निवड,ग्रामस्थांकडून अभिनंदन

नांदूर : नांदूर गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सतीश जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी बबनराव चिखले यांची निवड करण्यात आली. सरपंच पूनम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
सतीश जाधव हे नारायणगाव येथील लाला अर्बन बँकेत सेवेत कार्यरत असून सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात काम करण्याची त्यांना विशेष आवड आहे. गावातील नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा निर्माण करण्यासाठी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
गावातील विविध वाद व तंटे सामोपचाराने सोडवून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी शेखर चिखले, सोनल जाधव, रत्नाकर चिखले, सुषमा वायाळ, पोलिस पाटील रवींद्र विश्वासराव यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश जाधव व उपाध्यक्ष बबनराव चिखले यांचे अभिनंदन केले.
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!