मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा


मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा

पुणे : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. या छायाचित्रावर आक्षेप घेत अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चतुःश्रुंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह एकूण २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणामुळे पुण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चतुःश्रुंगी पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!