पुण्यात देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; ‘CJP’ म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा टोला


पुण्यात देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; ‘CJP’ म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा टोला

पुणे : भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विचारसरणीला थेट विरोध करण्याची क्षमता विरोधकांमध्ये उरलेली नसल्याने आता हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधकांचे पुढील लक्ष्य कुंभमेळा असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
यावेळी फडणवीस यांनी ‘CJP’ या मुद्द्यावरूनही विरोधकांना लक्ष्य केले. ‘CJP’चा अर्थ ‘Congress Jitao Program’ म्हणजेच ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असा असल्याचा टोला त्यांनी लगावला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी हेच महिला आरक्षणाचे खरे विरोधक असल्याचा आरोप करत, त्यांनी महिला आरक्षणाच्या कायद्याचे महत्त्वच कमी करण्याचा प्रयत्न केला, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
भाजप पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या या वक्तव्यांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!