एकल महिलांच्या सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची मागणी.


एकल महिलांच्या सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची मागणी

 

टाकळीभान (प्रतिनिधी)-नागरी भागातील एकल महिलांचे महाराष्ट्रात प्रथमच सर्वेक्षण सुरू झाले आहे. काही नगरपालिकांनी अद्याप सुरूवातच न के ल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

 

या सर्वेक्षणास महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन साऊ एकल 1 महिला समितीचे राज्य

 

समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, कारभारी गरड, संगिता मालकर, अशोक कुटे, बाळासाहेब जपे, तालुका समन्वयक प्रतिमा कुलकर्णी, प्रकाश इथापे, प्रकाश जोंधळे, दिलीप लोखंडे, श्रीकृष्ण बडाख, मुकुंद टंकसाळे, सचिन साळुंके, श्रीकांत बिडवे, उज्वला शेळके, प्रथमेश सोनवणे आर्दीनी केले आहे.

समितीच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील कोरोना एकल महिलांचे सर्वेक्षण झाले. नंतर सर्व प्रकारच्या एकल महिलांच्या सर्वेक्षणासाठी समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांच्यासह राज्यभरातील त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकल महिलांची नोंद झाली. ग्रामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण झाले. मात्र नागरी भागातील एकल महिला सर्वेक्षणास गती मिळत नव्हती. घरोघर जाऊन सर्वेक्षण न केल्यामुळे शहरातील सर्व एकल महिलांची नोंद झाली नाही.

नगरपरिषद प्रशासनशीला पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व महानगर पालिकांचे आयुक्त, सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या एकल महिला सर्वेक्षणाचे आदेश दिले. मात्र काही शहरांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण होत नसल्याच्या तक्रारी आल्याने घरोघर जाऊनच एकल महिलांचे सर्वेक्षण करावे, असे उपायुक्त शीला पाटील यांनी नव्याने निर्देश दिले आहेत. मात्र याची ३० ऑगस्ट रोजीच मुदत संपल्याने तसेच अनेक पालिका, महापालिकांनी घरोघर सर्वेक्षण सुरू न केल्याने या सर्वेक्षणास मुदतवाढीची मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीने केली आहे.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे श्रीरामपूर


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!