पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन; अनावश्यक सोन्याची खरेदी आणि परदेशातील खर्च टाळण्याचे आवाहन
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी गरज नसल्यास सोन्याची खरेदी टाळावी, तसेच अनावश्यक परदेश प्रवास आणि परदेशात विवाहसोहळे करण्याचे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि पैसा देशातच राहावा, या उद्देशाने नागरिकांनी स्थानिक पातळीवर खर्चाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भारताचा GDP वाढीचा दर ७.८ टक्के असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 30





