कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन.दिनार कुदळे व संचालकांचा सत्कार,


कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन.दिनार कुदळे व संचालकांचा सत्कार,

टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान विविध कार्य.सहकारी सोसायटी यांच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन.दिनार कुदळे.शंकरराव चव्हाण(संचालक.सुनिल मांजरे(संचालक)यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना व्हा. चेअरमन श्री.दिनार कुदळे यांनी पुढील पुढील ऊस गळीत हंगामासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने टाकळीभान व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य व वेळेवर ऊस तोडणी करण्यात येईल व ऊसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले,तसेच सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मंजाबापू थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले,

याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे,माजी चेअरमन मधुकर कोकणे,संचालक विजय कोकणे, अविनाश लोखंडे, एकनाथ पटारे.देवदान रणनवरे.दिलीप पवार.शिवाजीराव धुमाळ.सुधीर मगर,.भाऊसाहेब पवार.जयकर मगर.काकासाहेब कोकणे, अजित थोरात.दीपक डुकरे.बाळासाहेब शेळके.राजेंद्र देवळालकर.भैय्यासाहेब पठाण.रमेश कोकणे.सुरेश पटारे.सुरेश मुळे.अक्षय कोकणे,.नंदू रणनवरे.राधाकिसन इंगळे.रविंद्र पटारे.संजय कदम, बंडोपंत बहिरट,सचिव रामनाथ ब्राम्हणे.रवी शिरसाठ.रघुनाथ शेळके.विठ्ठल बनकर इ.ग्रामस्थ उपास्थित होते, शेवटी उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी आभार मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!