राममंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEOपदी माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा


राममंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEOपदी माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या CEOपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात दीर्घकाळ सेवा बजावली असून, त्यांच्या प्रशासकीय आणि नेतृत्वाच्या अनुभवामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले होते. CEO निवडीसाठी ६ जुलै रोजी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. तब्बल ५ हजारांहून अधिक अर्जांमधून जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे.
राममंदिराच्या वाढत्या प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मंदिरातील भाविकांची वाढती संख्या, देणगीचे व्यवस्थापन, सुरक्षा, प्रशासन आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ट्रस्टसमोर आहे.
दरम्यान, जून महिन्यात मंदिरातील दानपेटीतील रकमेच्या चोरीचे प्रकरण समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ट्रस्टने प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी CEO पदाची निर्मिती केल्याचे मानले जात आहे.
माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!