नागपुरात डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश


नागपुरात डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिमच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, ही बंदी ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहे.

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून मल्टी-लेयर साऊंड सिस्टिम बसवून त्याचा वापर केल्यास संबंधित वाहन सील करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मात्र, शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टिमला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवांमध्ये ध्वनी मर्यादांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!