वाहतूक नियम तोडल्यास ‘निगेटिव्ह पॉईंट्स’; नितीन गडकरींचा महत्त्वाचा प्रस्ताव
नवी दिल्ली (प्रतिनिधी : वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आळा घालण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘निगेटिव्ह पॉईंट्स’ अर्थात ‘डिमेरिट पॉईंट्स’ प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडला आहे.
या प्रस्तावित व्यवस्थेनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या नोंदीत निगेटिव्ह पॉईंट्स जमा केले जातील. वारंवार नियम तोडल्यामुळे हे गुण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास चालकाचा परवाना ठराविक कालावधीसाठी निलंबित किंवा गंभीर प्रकरणात रद्द केला जाऊ शकतो.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक नियमांचे पालन वाढवणे आणि वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करणे, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





